
राजकारणात नेहमी
बदल केले जातात
प्रत्येक सर्व निर्णयात
जनतेचेच हितच पाहतात।।१।।
पूर्वीच्या काळी विकासाचे
नव नवीन धैय होते समोर
म्हणून जनताही सुद्धा आपली
राहत होती समाधान बिनघोर।।२।।
आता मात्र राजकारणात
अनेक पक्ष स्थापन झाले
जनतेच्या विकासाला त्यांनी
खरंच दुय्यम स्थान दिले।।३।।
झाले शिक्षण खूप महाग
सरकारी शाळा बंद केले
विकासाच्या गतीचे आता
सर्व मार्ग सुद्धा बंद झाले।।४।।
आजचा तरुण वर्गाला
नोकरी मिळतच नाही
पैशाविना तरुण वर्ग हा
खरोखरच हतबल होई।।५।।
आजचे राजकारण पहा
सत्तेसाठी लढत आहे
गरीबाच्या विकासाला
नकळत खीळ बसत आहे।।६।।
देशाचे राजकारण कसे
शुद्ध आणि पवित्र असावे
प्रत्येक निर्णयात आपल्याला
जनतेच कल्याण हित दिसावे।।७।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर















