prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दीन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दीन

0
163

तरूणांच्या बलिदानाने
थरथरत्या लाहोर जेलच्या भिंती
जनतेचा महापूर लोटला
जेलच्या अवती भवती

तो अन्यायी ब्रिटिश काळ
स्वातंत्र्याचा कर्दनकाळ
आले इंग्रज व्यापारास
जखडले पाशात मातैस

गुलामीचे साखळदंड
झाले संस्थानिक जेरबंद
कायम धारा पद्धतीने
झाले शेतकरी अंदाधुंद
‌‌
झाले जागे जन मन
उठले पेटून एक होऊन
सत्याग्रहाची कास धरून
ब्रिटिशांना केले निशाण

चले जावचा लावून नारा
जागविला स्वदेश सारा
वाढले अन्याय जुलुम
जालियनवाला बागेत केले अमानुष हनन

नव्हती सीमा क्रुरतेची
निरपराध्यांच्या हत्येची
अश्याच लाठीमारात
बळी पडले लजपतराय

हे कठ़ोर अमानवी कृत्य
कळता भगतसिंग राजगुरूस
सुखदेवही झाले त्रस्त
झाले तीनही वीर भयग्रस्त

असेम्ब्लित बाॅम्ब टाकला
सॅन्डरस्ट उडवून दिला
केले वीरांना बंदीवान
लाहोर जेलमध्ये डांबून

तो काळा दिवस उगवला
23 मार्च 1931 सालाला
इन्कलाब जिंदाबाद
जयघोष शेवटचा केला

भयानक शिक्षा फाशीची
वेळ ठरली मग देण्याची
ते शूरवीर लडिवाळ
मातेचे परमवीर बाळ

मातेला शिरकमले अर्पून
चिरंजीव ठरला शहिद दिन
ही वीरगाथा शहिदांची
नित हृदयात स्मरण्याची

माझे विनम्र अभिवादन
चिरायू होवो हा शहिद दिन
मम भाव फूलांची‌ श्रद्धांजली
अर्पिते तयांच्या चरणावरी

निर्मला ज्ञानेश्वर बोरकर
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here