prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन

0
125

ठेवुनी चरणी माथा
नित्य करून स्मरण
ऐकून त्यांची ही गाथा
येते अंगावर स्फुरण

मातेच्या रक्षणासाठी
सांडले रक्त धरणी
सदैव सैनिक पाठी
करुनी रक्ताचे पाणी

पहा चाळून ती पाने
स्वातंत्र्यासाठी लढले
पहिले मरण त्याने
युद्धात मरण आले

अमर आज जाहले
आज आवाज घुमतो
शाहिद सुपुत्र झाले
डौलाने ध्वज सांगतो

देशाचा माझा सुपुत्र
त्याचा मला अभिमान
जागृत तो दिन रात्र
केले त्यांनी बलिदान

त्याचा जय जय कार
देशासाठी ते शहीद
राहिले नाव अमर
माता घालते साद

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here