
महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन च्या वतीने आयोजित गौरव कर्तव्याचा;सत्कार समाजसेवकांचा
बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बल्लारपूर शहरातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच त्याग माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ यांचे कार्य भारतभर पोहचविणाऱ्या आद. गायत्री अनिल कुमार रामटेके यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आतापर्यंत त्यांचे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात 185 प्रयोग झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या महामानवांचे कार्य पोचविण्याचे काम त्यां करीत आहेत.
हा समारंभ रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार आद.डॉ.सुनील गायकवाड होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिनेमा अभिनेत्री सुनंदा गावतुरे होत्या .प्रमुख उपस्थिती समाजसेविका मीनाक्षी पाखरे ,युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष पंकज काटे, साहित्य गझल कार मधुबावलकर, भीम शाहीर प्रबोधनकार प्रदीप कडबे, सुप्रसिद्ध गायक समाधान लोणकर ,भीम शाहीर सदानंद मोरे ,सामाजिक कार्यकर्ता पंचशीला वेले ,कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुफी सय्यद शमशुद्दीन इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यावेळी गायत्री रामटेके यांच्या मी सावित्री बोलतेय या बोलतेय या एकपात्री अभिनयाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले .त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील आणि एकपात्री प्रयोगाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गायत्री अनिल कुमार रामटेके यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ, शाल,मानाचा फेटा,देऊन नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित केले.
सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. त्याप्रसंगी खासदार आद.डॉ.सुनील गायकवाड यांनी सर्व पुरस्कारांमध्ये आई-वडिलांची सेवा हाच सर्वोच्च पुरस्कार आहे असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मांदळे यांनी केले .समाजसेवक सुफी सय्यद समशुद्दीन यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून ,सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कलावंत समाजसेवक उपस्थित होते.















