prabodhini news logo
Home गोवा पणजीच्या लेखिका प्रांजली चौधरी यांना नेपाळमध्ये ‘मातृभाषा रत्न मानद’ उपाधीने गौरव

पणजीच्या लेखिका प्रांजली चौधरी यांना नेपाळमध्ये ‘मातृभाषा रत्न मानद’ उपाधीने गौरव

0
121

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पणजी : गोव्यातील पणजी येथील प्रसिद्ध लेखिका आणि कवयत्री प्रांजली चौधरी यांना नेपाळमधील काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत मानाच्या ‘मातृभाषा रत्न मानद’ उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून नेपाळच्या प्रसिद्ध ‘शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन’ द्वारे हा गौरव सोहळा पार पडला.
नेपाळ आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करणे, देवनागरी लिपीचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच हिंदी आणि नेपाळी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भारत, नेपाळ आणि इतर पाच देशांतील सुमारे १००० प्रतिभावंत साहित्यिक, लेखक आणि शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
प्रांजली चौधरी यांनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना ही उपाधी प्रदान करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या सन्मानामुळे गोव्याच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here