
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका करत, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये आंबेडकर यांनी महागाईला “सुनामी”, बेरोजगारीला “आंधी” आणि गड्ढे तसेच घोटाळ्यांना सामान्य जनतेच्या अडचणींचे प्रमुख कारण ठरवत सरकारवर निशाणा साधला. यासोबतच त्यांनी नफरत पसरवणाऱ्या राजकारणावरही टीका केली.
घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल केला “नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?” या प्रश्नातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत गरजांवरील संकट अधोरेखित केले.
देशात वाढती महागाई, रोजगाराच्या संधींची कमतरता आणि जीवनावश्यक सेवांमधील अडचणी यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, सरकारने या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















