
बातम्यांची नेटकी मांडणी
लिखावट चोख आणि खरोखर
नेट लावून स्वतः राखतो वट
तोच असे खरा पत्रकार
जग करे वाखाणणी अव्याहत
पत्रकारांचे बळ असते लेखणीत
नवीन लेखातून जागतिक ज्ञान मिळे
पत्रकारीतेचा भाग असे उत्क्रांतीत
व्यावहारिक पातळीवर निर्भीड
सडेतोड आणि धारदार लेखन
पत्रकाराची दिसे नैतिकता
खरेपणाला नसे कधीही मरण
अन्यायाला वाचा फोडून
पिडीतांना न्याय देऊन
प्रसंगी प्राण पणा लावून
देतसे नवजीवन मिळवून
ओघवती शैली, शब्द भांडार
साधी प्रभावी कला पत्रकार
वंदन करुया त्यांसी त्रिवार
त्रिखंडात होई जयजयकार
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे















