prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊलवाट

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊलवाट

0
89

आयुष्यातून निघून गेलेली माणसे
त्या पुसून जाणाऱ्या आठवणी l
नाते विसरलेल्या व्यक्ती असे
वाटणे माझं जगात नाही कोणी l

आयुष्यातील असे काही क्षण
जे कधी परत न आणता येणारे l
आज हरवलेली पाऊलवाट ज्या
वाटेवरून एकेकाळी होतो जाणारे l

एकदा सायंकाळी समुद्रकिनारी
वाळूवर पाऊलखुणा उमटल्या l
पाऊले उमटलेली काही काळ
वारा आला लाटेने वाहत गेल्या l

पाऊलखुणा नाहीशी झाल्यावर
काळ आठवणी पुसून टाकतो l
जीवन पुढे पुढे जात राहते
भूतकाळ आपण विसरत जातो l

जुन्या दिवसाच्या आठवणी
विसरणे म्हणजे उदासीनता l
जीवनाच्या धावपळीत मागे
पडलेल्या आठवणी आठवता l

आठवणीने पश्चाताप मागे जाऊन
काहीतरी बदलण्याची इच्छा होणे l
इतिहास विसरा प्रगती म्हणजे
भुतकाळ मागे टाकून पुढे जाणे l

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here