prabodhini news logo
Home मराठवाडा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – पत्रकार

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – पत्रकार

0
95

सत्याची बाजू मांडणारा
एक तो पत्रकार असतो
त्याच्या लेखणीला सत्याची
किनार सजवून लावतो।।

खरं सांगायचं झालं तर पत्रकार हा निर्भीड ,प्रेमळ हुशार आणि चाणाक्ष वृत्तीचा असतो. न्यायाने वागणे हे त्याच्या रक्तातच असते. पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. म्हणून पत्रकाराला खूप मान सन्मान असतो. पत्रकार लोकांच्या घरा घरात जाऊन लोकांच्या समस्या प्रश्न सोडव्याचे काम फक्त पत्रकार करत असतो. सर्व क्षेत्रातील बातम्या प्रकाशीत करण्याचे काम पत्रकार करत असतो.
मग ते एखादी रेसिपी असो किंवा एखादी दुःखद घटना किंवा आनंददायी घटना तो तितक्याच शितापीने मांडण्याचे काम हे पत्रकार करत असतो. याचे बेस्ट उदारहण म्हणजे मा. प्रशांत रामटेके सर करतात. त्यांनी दाखवून देईल पत्रकार हा खरा पत्रकार असतो. आपल्या जिद्दीने मेहनतीने सर्व क्षेत्रातील बातम्या प्रकाशित करतात कुणाच्या वाढदिवस असो की कुणाचा मृत्यु ते सर्व प्रथम हजर राहतात. आणि स्वतःच काम बाजूला ठेवून अगोदर बातमी प्रकाशित करतात. पत्रकराला दिवस रात्र याचे भान नसते तर आपण कसे त्या सत्य घटनेपर्यंत पोहचले पाहिजे हेच पाहतात.
माननीय प्रशांत रामकेटे सर एक उतम पत्रकार आहेत त्यांनी प्रबोधिनी मंच स्थापन करून आपल्या आपल्या साहित्याला एक उच्च दर्जा प्राप्त करून दिला आहे. सर्व कवीला एक वेगळी ओळख प्रशांत रामटेके सर खूप छान पध्दतीने करून दिली आहे.
पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने जाणारा घटक आहे म्हणून त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.कोणतीही घटना घडली तर सर्वात अगोदर आमचा पत्रकार पोहचत असतो. आणि सत्य काय ते जाणून घेऊन आपली बातमी लोकांपर्यंत पोहोचण्याची काम हे फक्त पत्रकारच करतो. एकदा शेतकरी, वारकरी, साहित्यिक, राजकारणी किंवा नैसर्गिक आपत्ती याची सर्वात अगोदर माहिती पत्रकाराला कळते आणि मग नंतर सर्व जनतेला कळते. एवढेच महत्त्व पत्रकार व्यक्तीला असते आज काल डिजिटल जमाना झाला आहे त्यामुळे अनेक डिजिटल पोर्टल च्या माध्यमातून आपल्याला सर्वच बातम्या अशा डिजिटल पोर्टलवर वाचायला मिळत आहेत. तेही अतिशय सूंदर आकर्षक बातम्या आपण घरी बसल्या बसल्या वाचन करत असतो. तेही फक्त पत्रकारामुळे
नुकतेच पत्रकार दिन सर्व जगभर उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सर्व पत्रकार बंधुला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आपले कार्य असेच जोमाने आणि उत्साहाने करावे. सर्वांना न्याय मिळवून द्यावे आणि त्यांच्याही कार्याची भरभराट व्हावी हीच मनोमन इच्छा.

कर बुलंद हौसले इतना
खुदपर तुम्हे नाज हो
कल जितने सच्चाई थी
उतनी ही तुम्हारे पास आज हो।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here