
जीवनाची पाऊल वाट
तुझ्या संगती चालत आहे
सुखदुःखाच्या स्मृती मागे ठेवत
ही वाट पुढे पुढे जात राहे.||१||
बालपणीचे दिवस सुखाचे
चिमणदातांनी चिंचा बोरे खायचे
रानीवनी भटकत भटकत
नदीवर डुंबायचे खेळ असे रंगायचे.||२||
तरुणपणी अंगात भिनला वारा
मित्रमंडळी अवती भवती
‘ती ‘एकच खास होती
हातात हात घेवून स्वप्ने
रंगवली होती.||३||
पोटार्थी होताना हे सारे
राहीले गावी
बकुळगंधी आठवणी मन
गाभारी दरवळत आहे
मन त्याच वाटेवर रेंगाळत राहे ||४||
जीवनाच्या या वळणावर
वळून पहाता मागे क्षणभर
मुलायम ती पायवाट फुलांची आठवे
मन हेलावे नेत्री दाटे नीर.
अंजली गरगटे,
पुणे















