
शोधु कुठं सुखा तुला
तु नेहमी दुर जातो
दुःखाचा डोंगर नेहमी
माझ्या पुढं उभा राहातो
तुला शोधलं राऊळात
मज नाही भेटला
माझ्यासाठी का रे
तुझा झरा आटला
शोधले तुला रानीवनी
नाही भेटला तु कुठे
मग आला कंठ दाटून
नयनात मग अश्रु दाट
मग पाहीले अंतर्मनात
खोल खोल जाऊनी
सुख मानण्यावर असते
मग सुखावले मनोमनी
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे















