prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुखाचा शोध

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुखाचा शोध

0
170

सुखाचा शोध घेता घेता
आले अडथळे किती
चालता चालता वाटेत
वाटे मज भिती…..१

वाटेत किती काटे
दिसे ना मज फाटे
मनात काहूर माजले
सुख दिसे ना मज वाटे…..२

मिळाले कधी वाटेत फसवे
तर कधी डंक मारणारे भाटे
सुखाचा शोध घेता घेता
रुतले पायात किती काटे…..३

सुखाचा शोध घेता घेता
सुटले वादळ,वारे
पावसात नाव्हून निघाले
वाहून गेले सारे……४

माजले मनी काहूर
करून घ्यावा अंत
का दुःखात जगावे
मिटेल मनाची खंत….५

सुखाचा शोध घेता घेता
दुःख सारे सहन केले
येता सुख दारी माझ्या
आनंदात न्हाऊन निघाले….६

सौ रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here