
सुख म्हणजे नक्की काय असतं
इतरांचं तुमच्यावर असलेले प्रेम असतं
मायेने ओथंबलेले मन असतं
तुमच्या आनंदात सहभागी
हृदय असतं
सुखाचे गणित मांडताना
बेरीज करायची असते
दुःखदायक घटनांची
वजाबाकी करायची असते
आनंदांच्या क्षणांचा नेहमी
गुणाकार करायचा असतो
संकटात सांडलेल्या अश्रूंचा
भागाकार करायचा असतो
सुखाचा शोध घेताना प्रत्येकक्षण
एका धाग्यात ओवायचा असतो
ओंजळीतील सुगंधी फुलांचा
हळुवार सुवास घ्यायचा असतो
मदतीचा हात ज्याने दिला
त्याला नित्य स्मरायचे असते
गणितातल्या हातच्याने सदैव
सुख वाढवयाचे असते
सौ. वंदना शशिकांत पाटील















