
दुःखात सोबतीला
कुणी यार नव्हते
आश्वासनात त्यांचे
खोटे करार होते
सुखात सगळेच सहभागी होत असतात पण दुःखात कुणीही
सहभागी नसतात या दुःखातून
बाहेर पडण्यास एकच उपाय
तो म्हणजे सुखाचा शोध
सुख बाहेर शोधून मिळत
नाही ते तर आपल्या अंतऺमनात
शोधावे लागते शोधशी मानवा
राहुरी मंदिरी नांदतो देव हा
आपुल्या अंतरी सहवासाची
हमी असली तर हमखास
सुखाचा स्पशऺ मनाला शांती
देतो
दुःखातून बाहेर निघावे
असा स्वर वारंवार मला खुणावत गेला मग मी स्वतः ला ध्यानात मग्न केले ध्यान
असे लागले एकातांत एका
कोपऱ्यात बसून स्वतः ला
त्या विश्वात घेऊन गेलो
की मला सारे काही अनित्य
परिवतऺनशील वाटू लागले
हाच शोध मी सातत्याने
करीत राहिले केव्हा तो मागऺ
गवसला हे कळले सुद्धा नाही
फक्त सुखाचा आनंद मनाला
स्पशऺ करीत राहिला मनाला
तूत्ती समाधान लाभले याकरितां लोक धडटळत असतात मग खरचं त्यांना
तो मागऺ सुखाचा मूलमंत्र
मिळतो
याच विषयावर चिंतन
मनन करून पाहिले पण निरथऺक वाटले कारण त्यातून
फक्त भौतिक सुख मिळत होते
आध्यात्मिक सुखा करिता मला
ध्यान हाच मागऺ सुखाचा अचुक
वाटला तो मी स्विकारले
तूतऺ एवढेच या सुखा करिता कोणतीही किमंत मोजावी लागत नाही शून्यात
मला सुखाचा आनंद मिळाला
तोच खरा सुखाचा शोध वाटतो
मी शोधला बाकी तुम्हाला गवसला आवडला तर नक्कीच
निवडा सुखाचा शोध
खेमदेव हस्ते, गडचिरोली















