prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊल वाट

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊल वाट

0
68

बालपणीचा पाऊल वाट
आता नवखी वाटू लागली
जंगलातील ती झाडी दाट
अचानक ती कशी हरवली

याच वाटेवरून चालताना
तुझा पकडलेला घट्ट हात
अनामिक ओढ वाटे मना
यानेच केला का माझा घात

पाऊल वाट कधी हरवली
तुझी सुटली साथ नकळत
आज पर्यंत वाट तुझी पाहली
प्राण सारे आणून डोळ्यात

फक्त आठवणी राहिल्या मागे
त्या सतावतात रोज मला
तुटलेले जोडत असते धागे
ये रे अखेरच्या क्षणी भेटायला

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here