
नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नाशिक: येथील आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीने आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात, विविध क्षेत्रांतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘नाशिक भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ‘गुरुदक्षणा हॉल’ मध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला.
शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था (NGO), कर्मचारी संघटना, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक आयोग प्रशिक्षक प्रवक्ता, तसेच बँकिंग यांसारख्या विविध क्षेत्रांत केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना सत्कृत्यांनी भावना व्यक्त केल्या की, “हा सन्मान माझ्या आजवरच्या सामाजिक आणि प्रशासकीय प्रवासाची पोचपावती असून, भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. हा केवळ माझा सन्मान नाही, तर माझ्या प्रत्येक प्रयत्नाची, संघर्षाची आणि समाजासाठी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल आहे. हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच हा प्रवास शक्य झाला असून, पुढेही ही साथ अशीच राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















