
अहमदनगर प्रतिनिधी : समता, बंधुता आणि शिक्षणाचे अग्रदूत, स्त्री शिक्षणाचे जनक आणि शेतकरी चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी (द्विशताब्दी) जयंती आज ११ एप्रिल रोजी मेहेरबाबा फाटा, पिंपळगाव माळवी येथील ‘सावता प्रतिष्ठान’च्या वतीने मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना सुशांत शिंदे म्हणाले की, महात्मा फुले यांनी समाजातील दीन-दलितांना आणि महिलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यांच्या विचारांची आजच्या काळात मोठी गरज आहे.
या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य हरिष गायकवाड, शुभम शिंदे, संकेत शिंदे, समर्थ शिंदे, कुणाल भोंदे, केतन भोंदे, रुपेश पुंड, हर्षल पुंड, निखिल भोंदे, निकेत शिंदे, आदेश वाघमारे, मच्छिंद्र विरकर, शुभम क. शिंदे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.















