
जय महाराष्ट्र माझा
खरोखर भाग्यवंत
शोभते वीर पुरुष
फक्त इथे ज्ञानवंत।।१।।
दरी दरीतून नाद
गुंजला ठाई ठाई
सर्व जगाचे रक्षण
करीते भवानी आई।।२।।
सह्याद्रीचा थोर सिंह
शिवबा आमचा छान
अठरा पगड जातीचा
केला त्यांनी सन्मान।।३।।
महाराष्ट्राच्या या भूमीत
घुमते संताची ही वाणी
एकनाथ ,थोर ज्ञानेश्वर
सांगे महाराष्ट्राची कहाणी।।४।।
याच पावन भूमीत
डॉ. बाबासाहेब झाले
त्यांनी देशासाठी महान
असे संविधान लिहिले।।५।।
सह्याद्रीच्या कडे कपारी
प्रत्येक सांगत जाते गाथा
महान आमचा महाराष्ट्र आहे
फ़क्त तिथेच टकवितो माथा।।६।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे,
लातूर















