prabodhini news logo
Home ठळक बातम्या सफाई कर्मचाऱ्यांचे वारसा हक्क व योजनांचे प्रश्न मार्गी लावा

सफाई कर्मचाऱ्यांचे वारसा हक्क व योजनांचे प्रश्न मार्गी लावा

0
56

३० दिवसांत नियुक्त्या देण्याचे आदेशअहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

विजय प्रभुणे अहिल्यानगर प्रबोधिनी न्यूज – महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (४ एप्रिल २०२६) रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ३० दिवसांच्या आत नोकरीत सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.सदर बैठक महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. शेरसिंग डागोर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी प्रविण देवरे, विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारसा हक्कासाठी विशेष सूचना:बैठकीत लाड-पागे समितीच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळण्यात होणारा विलंब टाळून ३० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश डागोर साहेब यांनी दिले. तसेच यासंबंधीच्या सर्व शासन निर्णयांची (GR) माहिती अधिकाऱ्यांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली.शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार:केवळ नोकरीच नव्हे, तर सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि निवारा यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना ‘आयुष्मान कार्ड’ आणि ‘आवास योजना’ यांचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कॅम्पचे (शिबिर) नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.प्रलंबित प्रश्नांवर चर्चा:बैठकीत चव्हाण साहेबांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या स्थानिक समस्या मांडल्या. प्रत्येक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या सफाई कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचाव्यात, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.या बैठकीमुळे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here