
सहायक आयुक्त, समाजकल्याण येथे संपर्क करण्याचे आवाहन
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दि. 05 : जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने तृतीयपंथीयांची कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे.
त्याकरीता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटनेच्या प्रतिनिधीनी किंवा स्वतः तृतीयपंथी व्यक्तीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच तृतीयपंथीय असल्याबाबतची वैयक्तिक व रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरीत सादर करावी. जेणेकरून माहितीच्या आधारे संबंधित पोर्टलवर माहिती भरून तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने कळविले आहे.















