prabodhini news logo
Home चंद्रपूर डॉ. गायत्री रामटेके यांचा “लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड 2026” ने भव्य गौरव

डॉ. गायत्री रामटेके यांचा “लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड 2026” ने भव्य गौरव

0
86

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – बल्लारपूरच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. गायत्री अनिल रामटेके यांचा “लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड 2026” ने मुंबईत भव्य सन्मान करण्यात आला. मुंबईतील प्रतिष्ठित रहेजा क्लासिक क्लब येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा गौरव सोहळा पार पडला.

डॉ. गायत्री रामटेके या त्यांच्या प्रभावी आणि सामाजिक जाणिवा जागृत करणाऱ्या एकपात्री नाट्यप्रयोगांसाठी देशभर ओळखल्या जातात. “मी सावित्री बोलते”, “मी रमाई बोलते”, आणि “मी राजमाता जिजाऊ बोलते” या त्यांच्या गाजलेल्या नाट्यप्रयोगांद्वारे त्यांनी भारतीय स्त्रीशक्तीचा इतिहास आणि संघर्ष जिवंत केला आहे. त्यांच्या सशक्त अभिनयातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड 2026” प्रदान करण्यात आला. या वेळी सुप्रसिद्ध भजनसम्राट आणि पद्मश्री सन्मानित गायक अनुप जलोटा, ख्यातनाम संगीतकार दिलीप सेन, प्रख्यात विनोदी कलाकार सुनील पाल,लातूरचे माजी खासदार आणि संसदरत्न प्रा. डॉ. ॲड. सुनील बळीराम गायकवाड, उद्योगपती आदित्य सिंघानिया , विनोदी अभिनेता सुनील पाल तसेच कार्यक्रमाचे संयोजक डॉ. कृष्णा चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला भारतीय बौद्ध महासभा मुंबई असिस्टंट लेफ्टनंट जनरल आद.रमेश वाघमारे,पंचमीला वेले आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. डॉ. रामटेके यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

डॉ. गायत्री रामटेके यांचा हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचे प्रतीक नसून सामाजिक प्रबोधनासाठी कलाक्षेत्राच्या माध्यमातून केलेल्या कार्याची मोठी पावती आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here