
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी – नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालात ब्रम्हपुरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाची दखल घेत स्थानिक महर्षी वाल्मिकी बचत गटाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी ओमकार प्रमोदजी दिघोरे आणि रिया नत्थुजी चांदेकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
ओमकारची गरुडझेप: ८६.६०% गुणांसह उत्तीर्ण स्थानिक ख्रिस्तानंद इंग्रजी शाळेचा विद्यार्थी ओमकार दिघोरे याने दहावीच्या परीक्षेत ८६.६०% गुण मिळवून ‘प्रविण्य श्रेणी’त यश संपादन केले. ओमकारचे वडील प्रमोद दिघोरे हे एका खाजगी शाळेत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या यशाचे श्रेय देताना ओमकार म्हणाला: “नियोजित अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच मी हे यश मिळवू शकलो.”ओमकारने पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त केला आहे.
तसेच, बारावीच्या परीक्षेत नेवजाबाई हितकरणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिया नत्थुजी चांदेकर हिने बारावी विज्ञान मध्ये ७१.८३% गुण मिळवून यश संपादन केले. रियाने भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करून डॉक्टर’ होण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे.
या दोन्ही गुणवंतांच्या कौतुकासाठी महर्षी वाल्मिकी बचत गटाचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरीश कामडी, अनिल पचारे, अमोल भानारकर, प्रभुजी वाघधरे, आनंद शिवुरकर, संदिप भानारकर, गिरीधर सिंदीमेश्राम, नत्थुजी चांदेकर, तुकडोजी चाचरकर, व्यंकटेश चाचरकर, रविंद्र अलगदेवे, स्वप्निल अलगदेवे, प्रविण चाचरे, संजय दिघोरे, सुरेश दिघोरे, मुकेश भानारकर, हेमंत अलगदेवे, गणेश भानारकर आदींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशामुळे ब्रम्हपुरी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.















