prabodhini news logo
Home चंद्रपूर सावली तालुक्यातील भीषण अपघातात ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; जखमी महिलांची रुग्णालयात...

सावली तालुक्यातील भीषण अपघातात ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; जखमी महिलांची रुग्णालयात जाऊन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली भेट

0
63

सर्व जखमी महिलांवर योग्य उपचार करण्याच्या खासदार डॉ. किरसान यांच्या सूचना

सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सावली तालुक्यातील डोनाळा येथे महिलांना घेऊन जाणारा टेम्पो भीषण अपघातग्रस्त झाला. या दुर्घटनेत सुमारे ३० महिला जखमी झाल्या असून, त्यांना तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत जखमी महिलांची विचारपूस केली. तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व जखमींवर तातडीने व योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी खासदार डॉ. किरसान यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या इतर रुग्णांचीही विचारपूस केली. जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य केंद्र असल्याने रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधे तसेच वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाटे, नगरसेवक तथा गडचिरोली शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस कार्यकर्ते भाऊराव कोठारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जखमींचे नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here