prabodhini news logo
Home ठळक बातम्या सावधान! बिडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून नवऱ्या मुलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 5 जणांना...

सावधान! बिडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून नवऱ्या मुलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 5 जणांना ठोकल्या बेड्या, नाशिकमध्ये ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय

0
104

अमोल जगताप उपसंपादक प्रबोधिनी न्युज – बीड जिल्ह्यात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा फायदा घेत, गरजू मुलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच दागिने आणि रोकड घेऊन पसार होणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ सह तिच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

बीड ग्रामीण आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बनावट विवाह लावून फसवणूक होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, या टोळीतील मध्यस्थ प्रथम ‘चांगली मुलगी आहे’ असे सांगून मुलाकडच्यांशी संपर्क साधायचे. मुलगी गरीब असल्याचे भासवून लग्नाचा खर्च आणि इतर कारणांसाठी मुलाकडून लाखो रुपये उकळले जात होते. लग्न पार पडल्यानंतर काही दिवसांतच ही तरुणी घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार होते .चांगल्या घरातील वकील, इंजिनीरिंग आणि शासकीय अधिकारी यांना निशाणा केले जाते.
पोलिसांची कारवाई:

एका पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा मुख्य सूत्रधार आणि बनावट नवरी बनणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात या टोळीने बीड सह नाशिक,अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

मुलांनो, सावधान राहा

जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे:

१. अनोळखी मध्यस्थावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
2. . मुलीची आणि तिच्या कुटुंबाची पूर्ण चौकशी केल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेऊ नका.
3. लग्नासाठी पैशांची मागणी होत असेल, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या अनेक तरुणांना दिलासा मिळाला असून, पोलीस आता या टोळीने अजून किती जणांना फसवले आहे, याचा अधिक तपास करत आहेत.
4. नाशिक ग्रामीण आणि शहर आणि नाशिकरोड परिसरात अशाच प्रकारची टोळी कार्यरत आहे, पीडित तरुणांनी त्वरित पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here