prabodhini news logo
Home महाराष्ट्र प्रबोधिनी न्युज आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहाच्या संचालिका सौ. नम्रता प्रशांत...

प्रबोधिनी न्युज आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहाच्या संचालिका सौ. नम्रता प्रशांत रामटेके यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…!

0
82

साहित्य, समाजकार्य आणि संस्कारांची सुंदर सांगड घालत अनेकांच्या आयुष्यात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या आदरणीय सौ. नम्रताताई प्रशांत रामटेके यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपल्या लेखणीतून उमटणारे प्रत्येक शब्द समाजाला नवी दिशा देणारे ठरतात. साहित्य क्षेत्रात कार्य करत असताना अनेक नवोदित लेखक, कवी आणि कलावंतांना आपण प्रेमाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आपल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या प्रतिभेला नवी ओळख मिळाली आणि त्यांची स्वप्ने नव्या उंचीवर पोहोचली.
“प्रबोधिनी न्युज” आणि “प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह” यांच्या माध्यमातून आपण जपलेली साहित्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची नाळ खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या कार्यामध्ये नेहमीच सकारात्मकता, प्रेम, आपुलकी आणि माणसांना जोडण्याची ताकद दिसून येते.
आपल्या आयुष्यात आनंदाचे सुंदर रंग सदैव फुलत राहोत,
यशाची नवी शिखरे आपण सर करत राहोत,
आरोग्य, सुख, समृद्धी आणि समाधानाने आपले जीवन बहरत राहो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
वाढदिवसाच्या हार्दिक, आनंदमय आणि आभाळभर शुभेच्छा..!

स्वरांश स्वरा दिलीप करकरे
माणगाव, रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here