prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात: रांगी येथे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात: रांगी येथे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
4

धानोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २८ मे २०२६ गडचिरोली जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच, गुरुवारी (दि. २८ मे २०२६) रांगी येथे आणखी एक भीषण अपघात घडला. भरधाव चारचाकी वाहनाच्या (डंगा) जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी (क्रमांक MH-33-AB-1039) धानोरा येथून रांगीकडे जात होती.
त्याच वेळी रांगीकडून धानोरा दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी ‘डंगा’ वाहनाने लिसिट हायस्कूलजवळ असलेल्या धोकादायक वळणावर समोरासमोरून येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली.

मृताची ओळख आणि दुर्दैवी घटना या भीषण अपघातात नंदू चमरशिंग तुलावी (रा. खेडेगाव, मुरुमगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
नंदू तुलावी हे आपल्या बहिणीच्या घरी कोरेगाव (रांगी) येथे गृहप्रवेश पत्रिका देण्यासाठी जात होते, मात्र वाटेतच काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here