prabodhini news logo
Home चंद्रपूर हजारो लोकांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा; ब्रह्मपुरीत भव्य धम्म संमेलन संपन्न

हजारो लोकांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा; ब्रह्मपुरीत भव्य धम्म संमेलन संपन्न

0
150

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ब्रह्मपुरी : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा चंद्रपूर पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा तालुका ब्रह्मपुरीच्या वतीने धम्मभूमी, खेड रोड, ब्रह्मपुरी येथे आयोजित भव्य धम्म संमेलन व धम्मदीक्षा समारोहात हजारो नागरिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक कार्यक्रमात पूज्य स्थवीर बुद्धज्योती यांच्या हस्ते धम्मदीक्षा देण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय संघटक इंजि. पद्माकर गणवीर यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन करून त्यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रवीण कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ मध्ये साधू, संत आणि महंत यांच्या परिषदेत धर्मांतराचा निर्धार व्यक्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. सामाजिक समता आणि मानवमुक्तीसाठी त्यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून इंजि. पद्माकर गणवीर (राष्ट्रीय संघटक), इंजि. भास्कर हिवराळे (केंद्रीय शिक्षक), इंजि. मोहन नंदेश्वर (स्वागताध्यक्ष), श्याम रामटेके (अध्यक्ष, नागभीड), विजया रामटेके (जिल्हाध्यक्ष महिला), उषा दुर्गे (सरचिटणीस महिला), नारायण उके, झगडीदास रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी डॉ. रवींद्र गवई (राज्य सचिव, संस्कार) आणि इंजि. भास्कर हिवराळे यांनी आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात भारतीय बौद्ध महासभेची उद्दिष्टे, संघटनात्मक कार्यपद्धती, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच आर्थिक लेखाजोखा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध वक्त्या व कलावंत डॉ. गायत्रीताई रामटेके यांचा “मी रमाई बोलतेय” हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विद्या सुखदेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. अरुण सुखदेवे यांनी केले.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. मदन रामटेके, रवी गणवीर, नारायण उके, सिद्धार्थ शेंडे, विश्वजित लोणारे, सुभाष सहारे, सुरज मेश्राम, विद्या सुखदेवे, सरिता धाकडे, सुकेशिनी बनसोड, शालिनी सोरदे, हर्षा नगराळे, बौद्धाचार्य हिरामण मेश्राम, विजय वाकडे, अरुण सुखदेवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
धम्मदीक्षा, मार्गदर्शनपर व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हा सोहळा सामाजिक व धार्मिक जागृतीचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here