
पक्ष संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय जनता पक्षाचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते सिकंदर शेख यांची पुन्हा एकदा भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या नव्या घोषणेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीत विविध विधानसभा क्षेत्रांतील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे, पक्ष संघटना अधिक सक्षम करणे आणि आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविणे हे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले.
सिकंदर शेख यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अविनाश वारजूरकर, राजेंद्र गांधी, विजय राऊत, प्रमोद कडू, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, कृष्णा सहारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, अलका आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर, गणेश तळवेकर, वनिताताई कानडे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सिकंदर शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.














