Home चंद्रपूर भाजपा कार्यकर्त्यांच्या व इको-प्रो संघटनेच्या समयसूचकतेमुळे जखमी चितळाचा जीव वाचला; वन विभागाची...

भाजपा कार्यकर्त्यांच्या व इको-प्रो संघटनेच्या समयसूचकतेमुळे जखमी चितळाचा जीव वाचला; वन विभागाची तत्पर कारवाई

0
130

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर : बाबूपेठ येथील बालाजी मंदिर परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या चितळ (चित्तर) प्राण्याचा जीव भाजपा कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेमुळे तसेच वन विभागाच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाचला. या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांविषयी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
भाजपा कार्यकर्ते मनीष पिपरे, शुभम बोडाले, यश निखारे, सुशांत कातकर आणि सचिन कुमरे यांना परिसरात जखमी अवस्थेत पडलेल्या चितळाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. विशेष म्हणजे, याच दिवशी मनीष पिपरे यांचा वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांनी जखमी वन्यप्राण्याच्या मदतीसाठी पुढाकार घेत सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले.
मनीष पिपरे यांनी ही बाब माजी नगरसेविका सौ. कल्पनाताई बगुलकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कल्पनाताईंनी तात्काळ माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधत वन विभागाला माहिती दिली आणि आवश्यक मदतीची विनंती केली.

याचवेळी इको-प्रो संघटनेचे सदस्य अभय अमृतकर यांनीही वन विभागाशी संपर्क साधून बचाव कार्यात महत्त्वाचे सहकार्य केले.
माहिती मिळताच वन विभागाच्या बाबूपेठ क्षेत्रातील अधिकारी प्रियंका जावळेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने जखमी चितळाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आणि पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या वाहनातून रवाना केले.
या यशस्वी बचाव मोहिमेबद्दल माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, इको-प्रो संघटनेचे अभय अमृतकर, भाजपा कार्यकर्ते मनीष पिपरे, शुभम बोडाले, यश निखारे, सुशांत कातकर, सचिन कुमरे तसेच वन विभागाच्या अधिकारी सौ. प्रियंका जावळेकर आणि संपूर्ण वन विभागाच्या पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी नंदकिशोर बगुलकर, निखिल देवगडे, स्वप्नील शेंडे तसेच परिसरातील नागरिकांनीही बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, जखमी अथवा संकटात सापडलेल्या वन्यप्राण्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ वन विभागाला देऊन अशा संवेदनशील कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कल्पना बगुलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here