
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर :पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ओपन स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या SSKM (श्री शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूर) रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो खेळाडूंनी या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत SSKM अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट वेग, संतुलन व कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. विविध वयोगटांमध्ये अकॅडमीच्या खेळाडूंनी यश संपादन केले.
पदक विजेते खेळाडू :
वैभवी योगेश मसराम कास्य पदक
अधिर सुबोध जुन्नावर – इनलाईन स्केटिंग प्रकारात 1 लॅप व 2 लॅप शर्यतीमध्ये कांस्यपदक प्राप्त.
स्पर्धेत सहभागी खेळाडू :
हितांशी इचकापे
भार्गव गिरडकर
अवलीन वाभिटकर
अवनीश रांदाय
कृष्णा कलोडे
या यशाबद्दल सर्व खेळाडू, पालक तसेच प्रशिक्षक विनोद शंकर निखाडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
विशेष बाब म्हणजे, चंद्रपूर शहरात आजही स्वतंत्र स्केटिंग रिंगची सुविधा उपलब्ध नसताना देखील या चिमुकल्या खेळाडूंनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले आहे. मर्यादित सुविधा आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
खेळाडूंना माननीय पोलीस अधीक्षक डॉ. आयुष नोपानी साहेब, किशन नवघरे (RPI), पोलीस मुख्यालय, चंद्रपूर यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. तसेच स्केटिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा रमा गर्ग यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच यशस्वी कामगिरी करत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही चंद्रपूरचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“चंद्रपूरच्या स्केटर्सची झेप राज्यस्तरावर; आता लक्ष्य राष्ट्रीय पदकांचे!”














