
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज चंद्रपूर
9325205398
चंद्रपूर -भिम आर्मी (भारत एकता मिशन)संस्थापक अध्यक्ष ऍड. भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर सहारणपूर देवबंग येथे करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या विरोधात सुरेंद्र भाऊ रायपुरे जिल्हा अध्यक्ष भिम आर्मी चंद्रपूर, यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निषेध आंदोलन उभारले.
सदर आंदोलन यशस्वीते साठी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य जिल्ह्यातील सर्व सामाजिक तसेच राजकीय पक्षांना पटवून देतांना सांगितले कि हा हल्ला केवळ भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला नसून तो हल्ला आंबेडकरी चळवळीत प्रामाणिक पणे कार्य करणाऱ्या प्रत्येक सैनिकांवर आहे व आव्हान केले कि सर्वांनी या निषेध मोर्चात सामील व्हावे.

सुरेंद्र भाऊ रायपुरे यांच्या आव्हाहणाला साद देत समता सैनिक दलचे अध्यक्ष अनंता बाबरे,वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष जयदीपभाऊ खोब्रागडे, महिला आघाडी चंद्रपूर च्या अध्यक्षा तनुजा ताई रायपुरे, आर.पी.आय. खोब्रागडे गटच्या जिल्हा अध्यक्षा तारा ताई आत्राम,आठवले गट हे सर्व आपल्या टीम सोबत उपस्थित होते.
निषेध सभेचे संचालन निलेश ठाकरे यांनी केले तर अनेक मान्यवरांनी निषेध नोंदविला त्यात सर्वात आधी सुरेंद्र रायपुरे यांनी घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवित भाई चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा, आरोपीवर रासुका अंतर्गत खटला चाळविण्यात यावा तसेच भिम आर्मी च्या प्रत्येक जिल्हा अध्यक्ष यांना बंदूक वापरण्याचा परवाना देण्यात यावा अशी मांगणी केली, महाराष्ट्र सचिव शंकर भाई मुन यांनी सुद्धा या मागणीला दुजोरा देत निषेध नोंदविला,महाराष्ट्राचे प्रख्यात गायक, दिग्दर्शक, सिने अभिनेता अनिरुद्ध वनकर यांनी अतिशय भावुक होऊन आता भिती वाटते या वाक्यापासून निषेधपर भावना व्यक्त केल्या, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ अभ्यासक खुशाल तेलंग सर यांनी भाई चंद्रशेखर आझाद यांची पार्शवभूमी आणि आताचे कार्य यावर प्रकाश टाकला, ऍड सत्यजित उराडे,अंकुश वाघमारे,मुन्नाभाऊ खोब्रागडे,बाबुभाई अन्सारी,कमलेश रामटेके संघप्रकाश ठमके, अमर रामटेके,विशाखा ताई आमटे, ब्रिजेश तामगडे, राजू सोदारी, तनुजा ताई रायपुरे,जयदीप खोब्रागडे,प्राविन्य पाथर्डे, प्रणित भगत, कपिल भगत,भारत रंगारी,संदीप देव यांनी घडलेल्या प्रकाराचा शाब्दिक निषेध नोंदविला.
कार्यक्रमात प्रामुख्याने महाराष्ट्र सचिव शंकर मुन, विदर्भ सचिव राजू सोदारी,भिम आर्मी चंद्रपूर चे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ कातकर, सुरज भाऊ उपरे,संघटक विशाखा ताई आमटे,तालुका प्रमुख हिमांशू आवळे, महानगर उपप्रमुख उज्वलाताई देवगडे, छबीता धोटे, सुमिता गोंधडे, रेखा धोटे, क्रितिका आमटे, सुजाता पाथर्डे, संगीता तावाडे, सिंदेवाही तालुका प्रमुख अक्षय चहांदे,तेजस वानखेडे, धनंजय साखरे, प्रकाश मेश्राम, प्रलय नागदेवते, बल्लारपूर शहर अध्यक्ष शशिकांत निरंजणे, उपाध्यक्ष बबलू करमरकर,
भद्रावती शहर अध्यक्ष सिद्धार्थ बुरचुंडे, तालुका संघटक निशांत मेश्राम, राजरत्न पेटकर,भीमराव आमटे, स्वयम दुधे, विश्वनाथ मंडल, जयंत डांगे,गौतम गेडाम, प्रकाश मेश्राम,धीरज दुर्योधन, आकाश रामटेके, छोटू तितरे, संतोष खांडेकर, प्रकाश खांडेकर, भीमराव तेलंग, चित्रसेन रायपुरे,जयंत डांगे,सुरज कदम,कबीर घोनमोडे, सिद्धार्थ गणवीर,शालू कांबळे, ऋचा लोणारे, ललिता दुर्गे, मोनाली पाटील, ललिता दुर्गे, सुलभा चांदेकर, अश्विनी नरवाडे, तृप्ती उराडे, किरण खैरकार, शोभा नरवाडे, आशा उराडे, ज्योती उंदीरवाडे,हर्षवर्धन कोणरकर तसेच शेकडोच्या संख्येने भिम आर्मी चे सैनिक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन राजरत्न पेटकर यांनी करून कार्यक्रमांची सांगता केली.
तसेच जिल्हा अध्यक्ष यांनी एक शिष्टमंडल नेमुन जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविले त्यात भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा, आरोपीवर रासुका अंतर्गत गुन्हे दाखल,सर्व जिल्हा अध्यक्ष यांना शस्त्र वापरण्याचा परवाना इत्यादी मांगण्याचा उल्लेख केला.














