prabodhini news logo
Home ठळक बातम्या बदलीने गेलेल्या व आलेल्या दोन शिक्षकाचा शाळेच्या वतीने निरोप व सक्तार..

बदलीने गेलेल्या व आलेल्या दोन शिक्षकाचा शाळेच्या वतीने निरोप व सक्तार..

0
54

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819

डिगोळ- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांच्या शासनाच्या नियमानुसार बदल्या झाल्याने दोन गेले दोन नवीन शिक्षक आल्याने त्या शिक्षकांचा शाळेच्या वतीने जाणाऱ्यां शिक्षकाना सक्तार व भेटवस्तू देवून निरोप देण्यात आला तर येणाऱ्यां नवीन शिक्षकांचा शाळेच्या वतीने सक्तार दि.30/06/2023 रोजी शुक्रवारी शाळेच्या प्रांगणात करण्यात आला आहे.

यावेळी शाळेच्या वतीने बदली होवून गेलेल्या वंदना गिरी यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरशेळकी येथे तर सुनिल मुळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोळ वांजरवाडा येथे बदली झाली आहे या शिक्षकांचा सक्तार शाल श्रीफळ नारळ व भेटवस्तू देवून सक्तार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बिरादार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण. गटशिक्षणाधिकारी अनिल पांगे.केंद्र प्रमुख ईश्वर बिरादार तळेगाव दे. केंद्रप्रमुख विठ्ठल वाघमारे हिसामाबाद उजेड. केंद्र प्रमुख रमेश मुळे शिरूर अनंतपाळ. विरेंद्र उस्तुरगे केंद्रीय मुख्याध्यापक तळेगाव दे.तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब बिरादार. वैजनाथ बावगे माजी मुख्याध्यापक करखेली. बब्रुवान पाटील महाराज. सौ.कविता दासरे सरपंच गोविंद हंद्राळे चेअरमन पटसंख्या. मणकर्णा हजारे.आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षिका, अनिता घोणे एस.के.सुतार. ए.एस. वकील.आर.एस.बिरादार.काळेबाग सर. डी.पी लोहार आर.जी.शिवपुजे.एस.डी जाधव.बस्वराज सुगावे. शालीवाहन डोंगरे सर.आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए.एस. वकील यांनी केले तर प्रास्ताविक एस.के. सुतार यांनी केले.तर आभार काळेबाग यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here