prabodhini news logo
Home ठळक बातम्या सिंदेवाही तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा..

सिंदेवाही तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा..

0
64

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही – तहसील कार्यालय सिंदेवाहीमधिल एक तहसीलदार सहित तीन नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत .त्यातच नुकत्याच भडारा जिल्ह्यातून तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या बदलीनंतर महिन्याभरापूर्वी रुजू झालेल्या नवीन तहसीलदार निलीमा रंगारी यांना एका प्रकरणात निलंबित करण्यात आले .त्यानंतर एकमेव नायब तहसीलदार असलेले राजेश्वर मसराम यांची प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .आणि नायब तहसीलदार धात्रक यांची बाहेर ठिकाणी बदलीचे आदेश निघाले आहेत . दुसरे नायब तहसीलदार नेवारे हे या जून महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विधार्थी ,पालक व सामान्य नागरिकांची कामे रेंगाळली आहेत .याचा त्रास सर्वांना होतांना दिसून येत आहे.

जिल्हा महसूल प्रशासनाने या कार्यालयातील रिक्त पदांचा बेकलॅंग भरून त्रस्त नागरिक ,विध्यार्थी व पालक यांना राहत द्यावी ,अशी मागणी बहुजन समाज पार्टीचं ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष नंदकुमार खोब्रागडे ,उपाध्यक्ष विकास गेडाम ,चंद्रप्रकाश चहांदे ,सचिन बन्सोड शहर अध्यक्ष डा .रेवानंद बांबोळे ,उपाध्यक्ष तेजस डोंगरे ,युवराज जिवतोडे ,अनिल बारसागडे ,नंदू नागदेवते शितल शेंडे ,उपसरपंच शिल्पा बन्सोड,ग्रा .पं .सदस्य विलास शेंडे, नंदा नागदेवते,प्रज्वल नैताम ,शुभम गुरनुले ,बिस्मिल्ला शेखभाई, आम्रपाली बागेसर यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here