prabodhini news logo
Home ठळक बातम्या जाहीर सत्कार व अभिनंदन सोहळा साकोली येथे संपन्न

जाहीर सत्कार व अभिनंदन सोहळा साकोली येथे संपन्न

0
55

भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्युज

साकोली, दिनांक १ जूलै २०२३ सेवक संघ महाराष्ट्र (सेवानिवृत्त वन कर्मचारी संघ महाराष्ट्र) ही महाराष्ट्रातील युवा मने असलेल्या सेवानिवृत्त वन कर्मचाऱ्यांनी वर्धिष्णू वनांची जोपासना हे स्वप्न उराशी बाळगून स्थापन केलेली सेवाभावी अशासकीय संघटना असून महाराष्ट्रातील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक ते वनरक्षक या पदापर्यंतचे सेवानिवृत्त वनाधिकारी / कर्मचारी या संघाचे सदस्य आहेत.

आपणा सर्वांना विदीत असल्याप्रमाणे अमित उंदीरवाडे राहणार गोंदिया यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परीक्षेत ५८१ वे स्थान प्राप्त केली असून ते लवकरच केंद्र शासनाच्या अखिल भारतीय सेवेत दाखल होतील. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील रहिवाशांप्रमाणेच सेवक संघ महाराष्ट्र यांच्यासाठीसुध्दा अमित उंदीरवाडे यांचे हे यश, त्यांचे वडील चंद्रभान उंदीरवाडे हे वन खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याकारणाने, एक अभिमानाची बाब आहे. या कारणास्तव सेवक संघ महाराष्ट्र यांनी अमित उंदीरवाडे यांचा जाहीर सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम दिनांक १ जुलै २०२३ रोजी मनोहर भाई पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत करण्यात आला.
समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेमकृष्ण कापगते माजी विधानसभा सदस्य व डॉ. चिंतामणराव खुणे, प्राचार्य मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली उपस्थित होते तसेच सेवक संघाचे राज्यस्तरीय प्रतिनिधी म्हणून श्री एस. एम. जगताप सहअध्यक्ष अमरावती वनवृत्त शाखा हे हजर होते. सेवक संघाच्या नागपूर वनवृत्त शाखेचे श्री अशोक खुणे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी, सचिव श्री जी. एस. खांडेकर सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी नागपूर सचिव हजर होते.
सेवक संघातर्फे सल्लागार पत्की वनसंरक्षक सेवानिवृत्त यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here