
नरेश गजभिये
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
दरवर्षी डॉक्टर्स डे निमित्त आम्ही काही तरी उपक्रम राबवत असतो. याही वर्षी दिवस हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. माणूस म्हणून जन्माला येऊन मानवाच्या चांगल्या जीवनासाठी आपण काही करू शकतो ही खरं तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज डॉ. दिवाकर चकोले, डॉ. सुनील बोरकुटे या माझ्या डॉक्टर मित्रांसह भंडारा शहरातील बालउदय वर्ल्ड चिल्ड्रन इंडिया द्वारा संचालित गोकुळ स्थायी अनाथ आश्रमाला भेट दिली.
या अनाथ आश्रमातील अगदी लहान लहान मुलं आहेत जी जन्मतः दिव्यांग आहेत. त्यांना काही विशिष्ट औषधांची गरज असते. यातील एका लहान मुलाला वर्षभराच्या औषधाची सुविधा उपलब्ध करून दिली.
ज्या वयात किलबिल करत मुलांनी खेळावं-बागडावं त्या वयात अशा गोष्टींचा सामना या चिमुकल्यांना करावा लागतो हे दुःखदायक आहे. हे दुःख त्यांच्या आयुष्यात आपण असताना त्यांच्यासाठी काही तरी करू शकतो यात आनंद आहे. आपण डॉक्टर म्हणून त्यांच्यासाठी काही करू शकलो याचं समाधन आहे. ज्यांना शक्य आहे त्याही समाज घटकांनी अशा विद्यार्थ्यांना मदत करावी, असं आवाहन मी यानिमित्ताने करतो.














