
संकेत प. बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रतिनिधी न्युज
आज गुरु पौर्णिमा त्यानिमित्त धुळ्यांतील श्री.स्वामी समर्थ मंदिरात जावून दर्शन घेण्यांचा विचार केला आणि मंदिरात गेलो तर तेथे श्री स्वामी समर्थ यांची पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यांत आले होते त्या पालखी सोहळ्यांचा शुभारंभ महापौर ताईसो प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यांत आला भाविकांची प्रचंड गर्दी तरी सुध्दा ध्यानीमनी नसताना माझे पाय पालखीच्या दिशेने वळले आणि हात अलगद पालखीला लागले तोंडातून श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे शब्द निघाले सर्वानी साद दिली एकच भाग्यवंता सोबत असा प्रसंग घडत असतो मला आज श्री स्वामी समर्थ महाराजाच्या पालखी सोहळ्यांत सहभागी होता आले हे मी माझे सर्वात मोठे भाग्य समजतो आजचा दिवस मला आठविला की माझे वडील वैकुंठवाशी हभप नारायण भिवसन पाटील हे पंढरपुरची एक महिन्यांची वारी पुर्ण करुन गुरु पौर्णिमेच्या दिवशी रात्री येत त्यांना मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडे गावाच्या फाट्याजवळ बारा वाजता घेण्यांस जावे लागायचे आणि मोटरसायकल वर बसवून घराकडे येत असत पण माझे गुरुवर्य वडिल आमच्यात नसले तरी आजच्या दिवशी त्यांची आठवण आली आणि डोळे ओले झाले पण त्यांचा आर्शिवाद रुपी हात माझ्या पाठीशी सदैव आहेत म्हणुनच की काय आज श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेता आले हि विशेष बाब म्हणावी लागेल.














