महाराष्ट्र नवनिर्माण सेना दनका; कॉफी शॉप मध्ये सुरू असलेला गैरप्रकार तात्काळ थांबवा.

0
16

राधेशाम खरात
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

बुलढाणा- चिखली शहरातील जवळपास सर्व कॉफी शॉप मध्ये क्लासेसच्या नावाखाली अल्पवयीन मुले व मुली सर्रास गैर प्रकार करताना आढळत आहे. कॉफी शॉप मध्ये चहा पाण्याच्या नावाखाली लहान मुला मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार यापूर्वी उघड आलेला आहे. नुकत्याच शाळा उघडल्या असून अल्पवयीन मुले मुले सर्वात जास्त कॉफी शॉप मध्ये जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिखली शहरच्या वतीने दि.०६ जुलै रोजी मा. ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन चिखली यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये नमूद चिखली शहरातील काही कॉफी शॉप मध्ये ग्राहकांना बसण्यासाठी ४×४ ची बंद केबिन करून एक तासाचे सुमारे ३०० ते ५०० रुपये घेतल्या जाते. मात्र हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नसून काही कॉफी शॉप मध्ये आंबट शौकिनांचे सेवेसाठी पलंग सुद्धा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांवर वाईट संस्कार पडत चालले आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची कोठेही नोंद करण्यात येत नाही. सदर ठिकाणी एखादी विपरीत घटना घडल्यास कोण जबाबदार राहील ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व ग्राहकांचे नोंद आधार कार्ड दाखवूनच ग्राहकांना बसू द्यावे त्या ठिकाणी बंद असलेल्या सर्व केबिन खुल्या कराव्या कॉफी शॉप मध्ये पलंग कश्यासाठी हे तपासावे. बंद केबिन खुल्या करण्याचे आदेश देण्यात यावे. जेणेकरून कोणताही गैरप्रकार घडणार नाही. वरील मागण्या पूर्ण झाल्यास मनसे वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंबट शौकीनना चोप दिला जाईल. त्यावेळी होणाऱ्या दुर्घटनेस केवळ प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा चिखली शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख यांनी दिला त्यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, विभाग अध्यक्ष बंटी कळमकर यांसह अन्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here