
चंद्रपूर प्रतिनिधी/जिव्हाळा बी.एन.आर. बगीचा संघटना समिती तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष मा. श्याम काळे यांनी बगीचा सौंदर्यीकरण आणि काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकून आपले विचार मांडले.
तदनंतर मा.नगरसेवक वसंतराव देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच काही अडी अडचणी आल्यास सदैव मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे मत व्यक्त केले.
प्रसिद्ध जेष्ठ रंगकर्मी, नाटककार, कवी मा. श्री. जयदेव सोमनाथे यांनी आरोग्य हीच संपदा असून ती इथे मानवी जीवनामध्ये योगा, व्यायाम करणे आवश्यक आहे. मनुष्याने आपले मनातील विचार संभ्रम न ठेवता दुसऱ्याशी व्यक्त करावे. असे मत व्यक्त केले. त्यानंतर श्री. जयदेव सोमनाथे यांच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
आनंद ताकसांडे व संजय दिकोंडवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुभेच्छा देऊन समोरील वाटचालीस सर्वांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष सुनील खांडरे, प्रमोद कावळे, सचिव श्रीकांत कुमरे, सहसचिव रविन्द्र करीये, कोषाध्यक्ष लक्ष्मणराव कटरे, सुरेश चहांदे व सदस्यगण यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.














