prabodhini news logo
Home ठळक बातम्या माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूल, च्या वतीने वनमहोत्सव ...

माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूल, च्या वतीने वनमहोत्सव व वृक्षरोपण दिवस उत्साहात साजरा

0
49

मुल प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मूल – दिनांक ८ जुलै २०२३ रोज शनिवारला मुल नगरातील चीचाळा रोडवर प्रसिद्ध असलेल्या माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूल च्या वतीने गांधी चौक मूल येथे वनमहोत्सव दिनानिमित्य वर्ग ८ व ९ च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून ‘झाडे लावा,झाडे जगवा’ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश जनतेला दिला. यावेळी नगरातील प्रतिष्ठित नागरीकांना झाडांची रोपं भेट देण्यात आले. 8 जुलै ला शाळेच्या परिसरात वृक्षरोपनच कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आशा शेंडे अध्यक्ष नागपूर विभाग नैशग्रिक संवर्धन विभाग.श्रीरंग नागोशे विभागीय उपाध्यक्ष नैसग्रिक विभाग ,भाऊराव झाडे अध्यक्ष दिशा फाउंडेशन चंद्रपूर, मुख्याध्यापक रीमा कांबळे,उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद उपस्थित होते.मान्यवरांनी पर्यावरणाचे महत्त्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here