prabodhini news logo
Home ठळक बातम्या आई वडिलाचे कष्ट पाहून दोघानी केले जिद्दीनेअभ्यास आणि झाले PSI व CA

आई वडिलाचे कष्ट पाहून दोघानी केले जिद्दीनेअभ्यास आणि झाले PSI व CA

0
54

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथील सुनिता ककुरले व श्रीकृष्णा वाडकर सोपान वाडकर यांनी मोठ्या जिद्दीने व मेहनतीने आभ्यास लाईट नसेल तर तेलाचा दिवा लावून अभ्यास करण्याची जिद्द चिकाटी सोडली नसल्याने आई वडिलाचे शेतातील कष्ट पाहून शिक्षणाची जिद्द सोडली नाही अपयश येवून ही शिक्षणाची जिद्द न सोडता स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली असून या जिद्दीने यश मिळाल्याने डिगोळ गावात दोन PSI तर एक चार्टर्ड अकाउंटंट CA तीन जन अधिकारी बनवले आहेत

सोपान वाडकर
मुंबई पोलीस उपनिरीक्षक
मला मुळ शिक्षणाचा पका पाया येथील जि.प.शाळेने शिक्षण दिल्याने मी मुंबई पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहचलो आहे असे पोलीस उपनिरीक्षक सोपान वाडकर यांनी सक्तारप्रसंगी व्यक्त केले आहे.

डिगोळ ता.शिरूर अनंतपाळ येथील सोपान वाडकर यांची मुंबई पोलीस उपनिरीक्षकपदी गतवर्षी निवड झाली आहे

(दि 05/07/2023)रोजी गुरुवारी डिगोळ येथे ग्रामस्थाच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला आहे.कु. सुनिता ककुरले व श्रीकृष्णा वाडकर यांनीअथांग परिश्रम घेऊन शिक्षण घेतलेआहे सुनिता ककुरले यांची PIS पदी तर श्रीकृष्णा वाडकर यांची चार्टर्ड अकाउंटंट CA पदी निवड झालीआहे .

सुनिता ककूरले
P.S.I.पदी निवड
दोन तीन वेळेस नशिबाने हुलकावणी देऊनही मी शिक्षणाची जिद्द चिकाटी सोडली नाही.आपण काही तरी अधिकारी बनाव अस माझे स्वपनं होते.ते आज पुर्ण झाले आहे मी परिक्षा पास झाले आणि माझी P.S.I.पदी निवड झालीआहे. अशी खंत कु.सुनिता सुर्यकांत ककुरले यानी मनोगत प्रसंगी व्यक्त केली आहे
श्रीकृष्णा वाडकर
मुबई पोलीस उपनिरीक्षक
माझ्या वर आईवडिलांनी इयत्ता पहिली पासून ते CA पर्यतच्या शिक्षणावर खर्च करून खुप प्रेम दिल्याने मी इंथ पर्यंत पोहचलो आहे. आणि मला मुळ शिक्षणाचा गोडीचा पाया येथील झेंडपी शाळेने गोडीचा लळा लावला असल्याने मी आज मी चार्टर्ड अकाउंटंट CA या पदापर्यंत पोहोचलो आहे.अशी खंत श्रीकृष्णा गोपाळ वाडकर यांनी मनोगत प्रसंगी व्यक्त केले आहे.

एकाची 2022 मध्ये तर दोघांची 2023 मध्ये यशस्वी यश संपादन करुन अधिकारी झाल्याबद्दल डिगोळ येथील गावकऱ्यांनी कु.सुनिता सुर्यकांत ककुरले व श्रीकृष्णा गोपाळ वाडकर या दोघांचा आई वडिलासह फेटा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आलाआहे. व गावातून वाजत गाजत ढोलतासाच्या गजरात व फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली आहे.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब बिरादार राजकुमार बिरादार. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद बिरादार महाजन. उपाध्यक्ष महिपती वाडकर.शिवशंकर पाटील गुरुजी.रामदास वाडकर.गोपाळ वाडकर.तथागथ ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष राहूल कांबळे.तुकाराम वाडकर.शंकर बिरादार. राजाराम कलमे.सतिश बिरादार. बालाजी वाडकर.योगेश वाडकर. सतिश वाडकर. शुभम पाटील. पंडित वाडकर.प्रशांत वाडकर.एकनाथ ककुरले.रमाकांत बिरादार.वसंत वाडकर.रबानी शेख.आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here