prabodhini news logo
Home ठळक बातम्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या धान वाणाचा मोठया प्रमाणात अवलंब करावा- डॉ. गौतम...

शेतकऱ्यांनी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या धान वाणाचा मोठया प्रमाणात अवलंब करावा- डॉ. गौतम शामकुवर

0
57

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि, सिंदेवाही

सिंदेवाही विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही व कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही तर्फे खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा सिंदेवाही तालुक्यातील आदर्शगाव नाचनभट्टी येथे आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. मच्छिंद्रजी रामटेके, प्रगतशिल शेतकरी हे होते. सरपंचा सौ. विद्या खोब्रागडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री एस. एम. तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर, आत्मा प्रकल्प संचालक, प्रिती हिरलकर व प्रमुख मार्गदर्शक डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तसेच मार्गदर्शक डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे प्रगतशील शेतकरी सदस्याच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सर्वप्रथम डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार विभागीय कृषि संशोधन केंद्र यांनी खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा आयोजीत करण्यामागील उद्देश सांगुन विद्यापीठाने संशोधीत केलेल्या धान पिकाच्या विविध वाणाबद्दल, बिज प्रक्रियाचे महत्व तसेच तीन टक्के मिठाच्या द्रावणाचे बिजप्रक्रिया या तंत्रज्ञानामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे सांगून शेतक-यांनी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या घान वाणाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करावा असे प्रतिपादन केले. सोबतच धान शेतीमध्ये यांत्रिकीकरण, भाडे तत्तवारील कृषि यंत्रे व अवजारे यांचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढवून पिकाला लागणारा खर्च कमी करावा, जेणे करून निव्वळ उत्पन्न बादण्यास मदत होईल. रॉयझोबयिम. पिएसबी, अॅझोटोबॅक्टर व ट्रायकोडर्मा या जैविक घटकाचा वापर शेतीमध्ये करावा असे आवाहन केले.

डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी जमिनीचे आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञान ओलीत व खत व्यवस्थापन यांच्या बद्धल विस्तृत मार्गदर्शन शेतक-यांना केले. भाजीपाला पिकांची लागवड तंत्रज्ञान व संशोधनावर तसेच विविध जोड धंधा व सेंद्रिय शेती, तसेच एकात्मिक पीक पध्दती सोबतच शेतीपूरक उद्योगामध्ये मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, शेळीपालन, फळबाग व भाजीपाला लागवड या घटकांचा समावेश करावे असे सूचविले.सदर सभेदरम्यान शेतकरी चर्चा सत्रामध्ये शेतक-यांच्या विविधी प्रश्नाचे निराकरण डॉ. गौतम शामकुवर व डॉ. दिनोंद नागदेवते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here