prabodhini news logo
Home ठळक बातम्या उपअधीक्षक भूमी अभिलेख राहुरी कार्यालयाचा कडू यांनी स्विकारला पदभार

उपअधीक्षक भूमी अभिलेख राहुरी कार्यालयाचा कडू यांनी स्विकारला पदभार

0
69

शिवाजी दवणे
राहुरी तालुका प्रतिनिधी
9730170965

राहुरी : येथील उपअधीक्षक भुमि अभिलेख विभागाच्या कार्यालयाला अनेक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर उपअधिक्षक मिळाले आहे. उपअधीक्षक सुनिल कडु यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे क्रांतीसेनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
राहुरी येथिल भुमि अभिलेख कार्यालयात अनेक पदे रिक्त असताना उपअधिक्षक थोरात यांची बदली झाल्याने अनेक महिने हे पद रिक्त राहिले आहे. या पदावर पारनेर येथुन बदलून आलेले उपअधीक्षक सुनिल कडु यांनी राहुरी भुमि अभिलेख कार्यालयात उपअधिक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर क्रांतीसेनेच्या वतीने डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी डिस्टिलरी व्यवस्थापक बबनराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शरद गाडे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, इम्रानभाई देशमुख, सुनिल काचोळे, शेखर पवार, सोमनाथ वने, प्रतिक गाडे व हर्षद धोंडे आदी उपस्थित होते. उपअधीक्षक कडू यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सेवा वेळेत मिळाव्यात आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा क्रांतीसेनेने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here