prabodhini news logo
Home ब्रेकिंग न्युज गडबोरी येथे साप चावल्याने महिलेचा मृत्यू

गडबोरी येथे साप चावल्याने महिलेचा मृत्यू

0
264

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही – पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या गडबोरी येथे साप चावून एका महिलेचा मृत्यू झाला असून प्रतिभा विलास वढे वय ३६ वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे.
मयत प्रतिभा ही नेहमी प्रमाणे बुधवारी सकाळी ६ वाजता झोपून उठली. व बाहेर निघत असताना दरवाजाच्या पडद्याआड काहीतरी चावले असल्याचे तिला जाणवले. मात्र बाजूने उंदीर गेला असल्याने उंदीर चावला असेल, या भ्रमात मृतक प्रतिभा ही घरघुती काम करायला लागली. मात्र तिला बरे वाटत नसल्याने गावातील डॉक्टर कडे नेले. मात्र तब्येत जास्त खालावली असल्याचे पाहून तेथील डॉक्टरांनी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात जात पर्यंत प्रतिभा हीची तब्येत जास्तच खालावली. डॉक्टरांनी कोणतातरी विषारी साफ चावला असल्याचे सांगितले. व चंद्रपूर येथे पाठविले. त्यामुळे प्रतिभाला चंद्रपूर येथे नेत असताना चंद्रपूर जवळ तिचा मृत्यू झाला. सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शवविच्छेदन करून प्रेत गडबोरी येथे आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आणि सासू आहे. प्रतिभा ही शांत, सुस्वभावी, आणि मनमिळाऊ असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here