
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फटाके मुक्त दिवाळी अभियानांतर्गत विद्यामंदिर हायस्कूल ऊर्जानगर येथे मा.पी. एम. जाधव जिल्हाध्यक्ष महा अंनिस चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली फटाके मुक्त पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम शाळेची प्रार्थना झाल्यानंतर घेण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी नरेंद्र रहाटे, वानखेडे सर मुख्याध्यापक, देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष, राजा वेमुला माजी अध्यक्ष, राजीराम भजनकर, नितीन राव सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

यावेळी नारायण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना फटाके फोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम व वाचलेल्या पैशाचा सदूपउपयोग कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी देवराव कोंडेकर यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करा व प्रदूषण कमी करण्यास हातभार लावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी फटाके फोडणार नाही असा संकल्प केला. नरेंद्र रहाटे यांनी दिवाळी तसेच इतरही सण प्रदूषणमुक्त कसे करता येईल यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला २०० चे वर विद्यार्थी हजर राहून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घेतला व जवळपास रु.५० हजार वाचवुन त्यातून खेळणी, उपयोगी साहित्य, किल्ले बांधणी करिता खर्च करू असे सांगण्यात आले .या कार्यक्रमात शाळेच्या दुर्गापूर येथील गरजू विद्यार्थ्यांना देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष महा अंनिस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते नितीन राव यांच्या सहयोगाने बुक व पेनचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुळसंगे यांनी केले तर आभार मेश्राम मॅडम यांनी मानले आहे.
यावेळी शाळेचे शिक्षक गिरी, परचाके, सुर्तेकर शिक्षिका सोनमाणे, खंडारे व पराते, जाधव, विनीत भिरंगे आणि शाळेचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.











