prabodhini news logo
Home चंद्रपूर रत्नापूरात स्वस्त धान्य दुकानातुन शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ

रत्नापूरात स्वस्त धान्य दुकानातुन शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ

0
135

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी,
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सेवा सहकारी संस्था अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातुन शिधा पत्रिका धारक लाभार्थ्यीना शासनाने दिलेल्या दिपावली सणानिमीत्य आनंदाचा शिधावाटपाचा शुभारंभ नुकताच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बोरकर, उपाध्यक्ष मधुकर मेश्राम ,संचालक संदीप डोंगरवार, रंजीत मेश्राम ,मंगेश बोरकर ,योगीदास लोधे, जीतेंद्र बोरकर, ज्ञानेश्वर निकुरे ,पुरुषोतम लोखंडे ,विवेक लोधे, प्रभु ढोक, देवयानी बोरकर, गीता बोरकर, सचिव दिनेश्वर लोधे , यांच्या उपस्थीत पार पडला.
शासनाने अंत्योदय शिधापत्रिका धारक प्राधान्य कुटुंब शिधापत्रीका धारक व दारीद्रय रेषेखालील एपील केशरी शिधापत्रिका धारक यांना दिपावली सणानिमीत्य साखर, खाद्यतेल, चनादाळ ,रवा, मैदा, पोहा हे दैनदीन जीवनात वापरात येणारे साहीत्यचे आनंदाचा शिधा म्हणून देण्याचे जाहीर केले. आणी रत्नापूर येथील स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झाल्याने सर्व शिधापत्रिका धारक लाभार्थी यांना वाटप करण्यात येत आहे. अगदी दिपावली सणाच्या अगोदर हा आनंदाचा शिधा लाभार्थी यांना मिळत असल्याने शिधापत्रिका धारक लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले.

वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वितरक ईश्वर ठिकरे, कर्मचारी श्रीधर कोपूलवार, सुरेश मडावी यांनी सहकार्य केले यावेळी उपस्थीत मोठ्या प्रमाणात शिधापत्रिका धारक लाभार्थी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here