prabodhini news logo
Home चंद्रपूर वासेरा येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा जयंती उत्साहात साजरी.

वासेरा येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा जयंती उत्साहात साजरी.

0
134


कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिन्देवाही तालुक्यातील वासेरा येथे आद्य क्रांतिकारक, क्रांतीसुर्य, आपल्या महान विचारांनी आदिवासींच्या जिवनाला दिशा देणारे लोकनायक वीर बिरसा मुंडा जयंती तथा जनजातीय गौरव दिवस मोठ्या उत्साहात रॅली काढुन,ढोल ताशाच्या गजरात, महिला, पुरुष व विद्यार्थ्यांनी नाचत गाजत जयंती कार्यक्रम साजरा केला. संपूर्ण गावातुन बिरसामुंडा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. या मिरवणूकीत विद्यार्थी, महिला व पुरुषांनी आदिवासी समाजाची पारंपारिक वेशभूषा करुन नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले. आदिवासी नृत्य सादर करीत वीर बिरसामुंडा यांची मिरवणूक आकर्षण वाढवणारी ठरली.
यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमित केराम हे होते. मंचावर सत्कारमुर्ती योगेश कोवे, सुमीत मसराम, बाबा वरखेडे, शामराव कोवे,सुधाकर आळे, दुर्वेदास पेन्दाम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात अमित केराम यांनी आदिवासी जननायक भगवान बिरसामुंडा यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला गावातील नागरिक व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेन्द्र आत्राम तर आभार प्रदर्शन अमित सलामे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here