तिरुमलेश कंबलवार
गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली – गरीब कुटुंबातील महिलांना थोडाफार दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने अंत्योदय कार्डधारक महिलांना दरवर्षी एक साडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट सणाला साड्यांचे वितरण प्रत्येक पात्र कुटुंबांना केले जाणार आहे. सदर योजनेचा लाभ राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून महिलांना साड्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अंत्योदय कुटुंबाला थोडीफार मदत होईल.
वर्षाला मिळणार एक मोफत साडी
राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय कुटुंबातील महिलांना वर्षाला एक साडी मोफत दिली जाईल. कोणत्या सणाला साडी मोफत दिली जाईल, याबाबत शासनाने अद्यापही निश्चित केले नाही.
‘अंत्योदय’ धारकांना मिळणार लाभ
अंत्योदय कार्डधारक महिलांना मोफत साडीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अन्य कार्डधारकांना याचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यात नवीन शिधापत्रिकाधारक प्राधान्य कुटुंबातील आहेत.
जिल्ह्यात १ लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक जिल्ह्यात १ लाख १५७
शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत आहेत. तर १ लाख १७ हजार शिधापत्रिकाधारक प्राधान्य कुटुंबातील आहेत. यापैकी अंत्योदय कार्डधारकांनाच लाभ मिळेल.

