
सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.पालेबारसा येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण हरिदास देवाजी कुंभरे वय ४७ वर्ष यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, कृषी.उ.बाजार समिती संचालक मा.खुशाल लोडे व युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.वैभव गुज्जनवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
हरिदास देवाजी कुंभरे हे घरातील कर्तृत्वान कुटुंब प्रमुख आहेत मिडेल ते काम करून आपल्या गरीब संसाराचा गाढा चालवीत आहेत, मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे ते उपचार घेत होते.उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले,घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली.त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना. विजय वडेट्टीवार यांना संपर्क करून असून हरिदास देवाजी कुंभरे यांना आर्थिक मदत मिळवून दिली.
या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,कृ.ऊ.बा.स.सावलीचे संचालक मा. खुशाल लोडे, हिरापूरचे उपसरपंच मा.शरद कन्नाके, युवक कांग्रेस कमेटी सावलीचे उपाध्यक्ष मा.वैभव गुज्जनवार व मा.सुशील डहलकर, तसेच मा.चंद्रकांत करकाडे,मा.रमेश तिवाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.














