कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही
भारतीय संस्कृतीत चातुर्मासाला विशेष महत्व आहे. आषाढ शुक्ल देवशयनी एकादशी ते कार्तिक शुक्ल या चार महिन्यांच्या काळात हिंदू संस्कृतीत विविध व्रत, उपासतापास केले जातात.या दरम्यान गावागावांत काकड आरतीच्या माध्यमातून सामूहिकतेची एकसूत्रता गुंफली जात असते. नवरगाव येथील (रत्नापुर) हेटी वार्डातील नागोबा देवस्थानात काकड आरतीचा सोहळा पार पडतो.
या कार्तिक महिन्यात अगदी पहाटे उठून स्नानादी आटोपून वार्डतील भक्तगण काकड आरतीच्या निमित्ताने लोक मंदिरात येत असतात. नवरगांव येथील हेटी वार्डातील काकड आरतीची परंपरा ८० वर्षापासूनची आहे. आधीच्या पीढीतील परंपरा आजच्या युवा व बालगोपालांनी अखंडित सुरू ठेवली आहे. हेटी वार्डातील छोट्याशा नागोबा मंदीर देवस्थानाच्या परिसरात
काकड आरतीचे सूर निनादायचे.
आजच्या घडीला दरवर्षीची ही परंपरा हेटी वार्डातील नव्या पिढीतल्या काही संस्कृतीप्रिय तरुणांसह बालगोपाल व महीलांनी कायम ठेवली. रोज पहाटे काकड आरतीला उत्साहाने येऊ लागले. कार्तिक महिन्यातील काकड आरतीचा हा उत्सव सांस्कृतिक ओळख बनला आहे. या काकड आरतीला किशोर नंदनवार माजी ग्रामपंचायत सदस्य,चितामण सोनकुसरे, मिथुन सोनकुसरे, अतुल शेंडे, घनशाम सोनकुसरे, मयूर गोन्नाडे, नरेश निमजे, रेखा नंदनवार, मिना निमजे, संजय सोनकुसरे, आशा नंदनवार, रेखा नंदनवार यांच्यासह बालगोपालांचे सहकार्य लाभत आहे.या कार्यक्रमाची सांगता गोपालकाला व स्नेहभोजनाने करण्यात आली.

