दलित तरुण हत्याकांड प्रकरणी; भीमराज कि बेटी अँड.सोनिया गजभिये न्यायालयात मांडणार बाजू
नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भीमराज की बेटी अँड सोनिया गजभिये यांची दलित तरुण हत्याकांड प्रकरणी पिडित परिवाराला रामटेक येथे भेट
रामटेक मध्ये विवेक खोब्रागडे या दलित युवकाची हत्या झालेली आहे, धक्कादायक म्हणजे ‘मंदिरात प्रवेश केल्यामुळे’ दलित तरूणाचा मॄत्यू झालेला आहे.
विवेक हा तरुण आपला मित्र फैजान खान बरोबर रविवार ला रामटेकच्या गडमंदिरात शोभायात्रा पाहायला गेले होते, ती शोभायात्रा संपल्यानंतर परत येत असताना गडमंदिर मार्गावर या दोघांना मनिष भारती, जितेंद्र गिरी, सत्येद्र गिरी व त्याच्या ५ ते ६ सहकार्यानी अडवून’ तुम्ही दलित आणि मुस्लिम असूनही येथे कशाला आलात ? ‘ असा सवाल केला व त्याना बेदम मारहान केली, त्यानंतर जखमी अवस्थेत विवेक खोब्रागडे यांना त्यांच्या वडीलांनी कामठीतील चौधरी हाॅस्पिटल येथे दाखल केले तेथे डॉक्टरानी तपासून विवेक याला मृत घोषित केले.
याप्रकरनी रामटेक पोलिसांनी विश्वनाथ खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून ३०२,३४,३२३,५०४,५०६,३४ भारतीय दंड संहिता सोबतच ३(२)(v) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंध ) अधिनियम,१९८९ नुसार गुन्हा दाखल करून काल पर्यत ५ आरोपीना अटक केलेली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागिय पोलिस अधिकारी आशीत कांबळे हे करीत आहेत.
दलित तरूणाची जातीय व्देषातून हत्या करण्यात आलेली आहे हि घटना महाराष्टाला काळिमा फासणारी आहे, या करीता भीमराज की बेटी संघटन ही निषेध व्यक्त करते. काल पिडीत परिवाराला भेट दिली असता पिडीत परिवाराला एकुलता एक मुलगा मरण पावल्यामुळे फार मोठा मानसिक धक्का पोहचलेला आहे, पिडीत परिवाराला एक मुलगी आहे, तीला आता सरकारी नौकरी मिळवून देण्याकरीता भीमराज की बेटी सज्ज झालेली आहे, सामाजिक न्याय विभाग कडून ४,००,००० रू इतकी रक्कम पिडित परिवाराला त्वरीत आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेली आहे. पिडित परिवाराला न्याय मिळवून देण्याकरीता एड सोनिया गजभिये या तक्रारदारा तर्फ कोर्टात बाजू मांडतील.

